5 May 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

आता पाणी डोक्यावरून गेलंय | आजच दिल्लीला ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवा - दिल्ली हायकोर्ट

Delhi high court

नवी दिल्ली, १ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.

मृतांच्या आकड्यांविषयी बोलायचे झाले तर जगात सर्वात जास्त मृत्यू भारतामध्येच होत आहेत. काल येथे कोरोनामुळे 3,521 लोकांचा मृत्यू झाला. हा देखील एक विक्रम आहे. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. येथे 828 संक्रमितांनी प्राण गमावले आहेत.

दरम्यान, देशात सर्वत्र ऑक्सिजन, रेमडीसीवीर आणि लसीच्या तुटवड्यामुळे मोदी सरकारवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देखील इस्पितळांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी आज दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात 8 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत इस्पितळातील गॅस्ट्रो विभागाचे डॉक्टर डॉ. एस.सी.एल. गुप्ता प्रसार माध्यमांना माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी सध्याच्या स्थिती वरून अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

दरम्यान, आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेचे पडसाद दिल्ली हायकोर्टाच्या या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये देखील पडताना दिसत आहेत. आज याच सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे. “आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे”, असे आदेश दिल्ली उच्च हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा देखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.

 

News English Summary: The repercussions of the tragedy this afternoon are also being felt in the ongoing hearing of the Delhi High Court case. During today’s hearing, the Delhi High Court slammed the Center. “Now the water has gone over my head. Now we need implementation. You’re going to take care of everything now. The Delhi High Court has directed the Center to provide 490 metric tonnes of oxygen to Delhi today.

News English Title: Delhi high court fired Modi govt over oxygen shortage issue in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x