19 August 2019 3:23 AM
अँप डाउनलोड

अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पंतप्रधान मोदींच्या बहुमतातील सरकारचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा नियक्ती झाली असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ते ५ वर्षे या पदावर राहणार आहेत. किर्ती पदक मिळणारे अजित डोवाल हे पहिले IPS अधिकारी आहेत.

१९६८ च्या केरळ बॅचचे ते अयापीएस अधिकारी आहेत. ४ वर्षांनंतर १९७२ मध्ये ते इंटेलीजेंस ब्युरोसोबत जोडले गेल. भारतीय गुप्तचर यंत्रणेत त्यांचे महत्वाचे स्थान आहे. १९८९ मध्ये पंजाबच्या सुवर्ण मंदिरातून कट्टरतावाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या आपरेशन ब्लॅक थंडरचे अजित डोवाल यांनी नेतृत्त्व केले होते.

३० मे २०१४ ला पंतप्रधान मोदी सत्तेवर येताच त्यांनी डोवाल यांना देशाचे ५ वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवडले. आज पुन्हा याच पदावर नियुक्ती झाली व त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Narendra Modi(917)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या