नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणामुळे देशाची मान खाली आहे. संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध होत असताना भाजपातील एक बड्या नेत्या सुषमा स्वराज यांची आज जनतेला आठवण झाली आहे. कारण २०१२ मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणी संपूर्ण लोकसभा आपल्या भावना प्रदान भाषणाने हादरवून सोडणाऱ्या त्याच सुषमा स्वराज आज उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत.

२०१२ मध्ये सुषमा स्वराज यांनी निर्भया बलात्कार प्रकरणी एक तडफदार भाषण केलं होतं. त्यात त्यांनी एका स्त्रीच्या तीव्र भावना लोकसभेत व्यक्त करत अपराध्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती ज्याला भाजपच्या खासदारांनी सुद्धा बेंच वाजवत सहमती दर्शविली होती. त्यावेळी निर्भया बलात्कार प्रकरणी सुषमा स्वराज यांनी जी भूमिका घेतली होती शंभर टक्के योग्यच होती यात काहीच वाद नाही.

परंतु जनतेला हाच प्रश्न पडला आहे की, २०१२ मध्ये काँग्रेसच्या राजवटी लोकसभा हलवून सोडणाऱ्या सुषमा स्वराज आज लोकसभेत गप्प का आहेत ? का सध्याच्या देशभर गाजणाऱ्या आणि संपूर्ण देशाला मान शरमेने खाली घालावयास लावणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाच्याच आमदाराचं नाव अडकल्यामुळे त्या गप्प आहेत असा प्रश्न सामान्य जनता विचारात आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणी सुषमा स्वराज यांच्या त्याच भाषणाची आम्ही सर्वांना आठवण करून देत आहोत,

Why Sushama Swaraj quite on unnao gang rape