15 December 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ED ला काही नेत्यांचे पुरावे दिलेले | ते भाजपवासी होताच...

Shivsena, ED misuse, Saamana Newspaper editorial, Kirit Somiaya

मुंबई, ७ जानेवारी: राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.

राहुल गांधी पुन्हा येत आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही असा आरोपही शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर केला आहे.

मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने नेत्याने ईडी वगैरे संस्थांकडे भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत. या नेत्यांवर ईडी अजून कारवाई का करत नाही? असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भारतीय जनता पक्षावासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची सुरनळी केली आहे का?’ असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे? असा रोखठोक सवाल शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाने चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामनाने ही टीका केली आहे.

 

News English Summary: Mulund’s stuttering parrot has given evidence of corrupt leaders to the ED and other institutions in the mean time. Why is the ED not taking action against these leaders yet? Since all the people who were being asked were Bharatiya Janata Party (BJP) supporters, have the Central Investigation Agency (CIA) sorted out the evidence?’

News English Title: Shivsena criticised BJP over ED misuse politics in Saamana Newspaper editorial news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x