17 May 2021 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व
x

ईडीचं ट्विट पहाटे ४:४२ | भाजप नेत्याचं ट्विट पहाटे ५:१२ | व्हिडिओ | एवढं जागरण?

ED tweet, Pravin Raut property, Kirit Somaiya

मुंबई, ०१ जानेवारी : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. दरम्यान PMC Bank घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, PMC Bank घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती. या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली होती.

मात्र काही संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत, कारण विरोधकांनी यापूर्वी अनेकदा भाजप सत्तेचा गैरवापर करून ईडीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र प्रवीण राऊत यांच्या संदर्भातील ३ ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. कारण प्रवीण राऊत यांची ७२ कोटीची मालमत्ता जप्त ईडीने जप्त केल्या संदर्भात ईडीने पहाटे म्हणजे सकाळी ४:४२ वाजता ट्विट केले. त्यातून ईडीचे अधिकारी झोपत नसावेत असा संशय निर्माण झाला आहे. मात्र त्यानंतर भाजपचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत जागरण करत असावेत असा देखील संशय निर्माण होऊ शकतो.

कारण भाजपचे आरोप करण्यात प्रसिद्ध असलेले माजी खासदार किरीट सोमैया यांनी ईडीने पहाटे म्हणजे सकाळी ४:४२ वाजता ट्विट केल्यानंतर किरीट सोमैया यांनी देखील पहाटे म्हणजे सकाळी ५:१२ वाजता म्हणजे ईडीच्या ट्विटनंतर अवघ्या ३० मिनिटात ट्विट केलं. त्याच्या काही वेळातच त्यांनी पहाटे व्हिडिओ देखील रेकॉड केला आहे. विशेष म्हणजे किरीट सोमैया यांच्या चेहऱ्यावर झोपेतून उठल्याचा लवलेशही दिसत नाही. त्यामुळे या अचूक ताळमेळाबद्दल देखील संशय निर्माण होऊ शकतो आणि विरोधकांच्या दाव्याला बळ मिळू शकतं. अगदी झाप सोडून एखाद्या पक्षाचे IT Cell सुद्धा जागरण करून समाज माध्यमं सांभाळत नाहीत.

त्यात दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांची बँक खाती आणि त्यावरील माहिती कोणत्याही सामान्य व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. केवळ सरकार किंवा पोलीस, सीबीआय, ED किंवा तत्सम तपास यंत्रणांना ती माहिती प्राप्त होऊ शकते. मात्र किरीट सोमैया यांना कोणत्या बँक अकाऊंटवरून कोणाच्या अकाउंटवर पैसे वर्ग झाले आहेत हे कसं समजत आहे. कारण ते कोणत्याही तपास यंत्रणेचा भाग नाहीत. त्यामुळे उद्या हे विषय पुढे आल्यास भाजप देखील संशयाच्या भवऱ्यात येऊ शकतं. कारण सदर वृत्त माध्यमांमध्ये देखील काही वेळापूर्वी आली आहेत. पण भाजप नेत्यांकडे भल्या पहाटे माहिती पोहोचते कशी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

News English Summary: Varsha Raut, wife of Shiv Sena Rajya Sabha MP Sanjay Raut, has been issued a notice by the Enforcement Directorate (ED). Meanwhile, Praveen Raut’s ED has seized assets worth Rs 72 crore in the PMC Bank scam. Praveen Raut, who is close to Shiv Sena MP Sanjay Raut, has been slapped by the ED.

News English Title: ED tweet about Pravin Raut property early morning but BJP leaders was also engage early morning news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x