25 April 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

ED Vs Shivsena | 5 जानेवारीला शिवसेना ED विरोधात थेट रस्त्यावर

shivsena, ED, sanjay raut

मुंबई, ०३ जानेवारी: प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेनं आता ED विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह दोन्ही मुलांना तर संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवला होता. ईडीच्या रडारवर शिवसेना नेत्यांचा परिवार असल्याचं प्रथम दर्शनी जाणवत आहे आणि त्यामुळे शिवसेनेत संताप वाढत आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र असल्याचा शिवसेनेनं याआधी आरोप केला होता. पण आता शिवसेना थेट ईडीविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. याआधी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असल्याचा बॅनर लावून भाजपवर टीका केली होती.

 

News English Summary: MP Sanjay Raut’s wife Varsha Raut will be questioned by the ED on January 5. There is a possibility of a show of strength from Shiv Sena. It is learned that Shiv Sainiks will arrive in Mumbai on January 5 by buses and private trains from Mumbai, Navi Mumbai, Thane, Mira Bhayander area. Shiv Sena leaders have been issued notices by the ED in the last few days and now the Shiv Sena has taken an aggressive stance against the ED.

News English Title: Shivsena decided to aggressive against ED after action against Shivsena leaders news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x