शेतकऱ्यांना मोदी-शाह सारखे मध्यस्थ नकोयत | शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील
नवी दिल्ली, ११ डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.
राकेश टिकैट म्हणाले की, ‘आम्ही कृषिमंत्र्यांचे ऐकत होतो … त्यांनी काही सुद्धा नवीन सांगितले नाही. त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या आम्हाला मान्य नाहीत. एमएसपी दिल्याशिवाय आम्ही येथून सोडणार नाही. हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी लावून धरली आहे.
आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान राकेश टिकैत म्हणाले की एमएसपी लागू करण्याची मागणी आम्ही केली होती, पण सरकारने ती पूर्ण केली नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना हेच हवे आहे. या सरकारच्या कार्यकाळात स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणीही झालेली नाही. टिकैट म्हणाले की, जर सरकार 80 टक्के बदल करण्यास तयार असेल तर हे कायदे किती वाईट आहेत हे आपल्याला समजू शकेल. सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एकीकडे सरकार स्वतः योग्य असल्याचं सांगत शेतकरी आंदोलकांना दोष देत आहेत दुसरीकडे केंद्र सरकार हट्टीपणा दाखवत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील शेतकरी समर्थक आणि केंद्र सरकार सर्मथक असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळते आहे. त्यात एक टीका प्रसिद्ध ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन केली आहे.
बुधवारी शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर प्रशांत भूषण यांनी एक फोटो शेअर करत, “शेतकऱ्यांनाही मोदी आणि शाह यांच्यासारखी मध्यस्थ (मिडल मॅन) नकोयत,” असा टोला लगावला आहे. प्रशांत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये “शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील. त्यांना मिडल मॅनची गरज नाही,” असा मजकूर लिहीला आहे.
Farmers also want to do away with middle men like Modi & Shah! pic.twitter.com/gAet1VyKti
— Prashant Bhushan (@pbhushan1) December 9, 2020
News English Summary: After the farmers rejected the government’s proposal on Wednesday, Prashant Bhushan shared a photo saying, “Farmers don’t want a middle man like Modi and Shah.” In the photo shared by Prashant, “Farmers will talk directly to Ambani-Adani. They don’t need a middle man, “the text reads.
News English Title: Farmers do not need middle men like Modi and Shah said Prashant Bhushan tweet news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा