15 May 2021 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

कर्नाटकात भाजपकडून पुन्हा आमदार फोडाफोडी? येडियुरप्पा पुन्हा सक्रिय

कर्नाटक : भाजपकडून कर्नाटकात पुन्हा सत्ताधारी पक्षातील आमदार फोडाफोडी करून सत्ता स्थाणपणेचा दावा केला जाऊ शकतो. जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या असून, त्यांना भाजपमध्ये सामील करण्याच्या हालचालींनी कर्नाटकात जोर धरला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ या घटनेवर लक्ष ठेऊन असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच कर्नाटकात मोठ्या राजकीय घटना घडण्याची शक्यता आहे. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करण्याआधीच भाजपचे सरकार येईल असा दावा केला होता.

केंद्रीय भाजप नैतृत्वाला सध्या २०१९ मधील निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकची सत्ता हातात असणे भाजपाला गरजेचे वाटू लागले आहे. काँग्रेस- जेडीएसमधील नाराज आमदारांना भाजपसोबत आणून त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा करून घेण्याची योजना दिल्लीश्वरांनी आखली आहे. त्यामुळे लवकरच कर्नाटकात मोठ्या राजकीय घटना घडण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(256)BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x