26 July 2021 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

तामिळनाडू डीएमके-काँग्रेस आघाडीचा निर्णय | कोरोना रुग्णांचा खाजगी इस्पितळातील खर्च राज्य सरकार करणार

Tamilnadu CM Stalin

चेन्नई, ०७ मे | डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज (७ मे) राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये १९ माजी मंत्री आणि १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आमदारांना मंत्री बनविण्याच्या आणि त्यांच्या खात्यांच्या वाटपाच्या शिफारशींना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे स्टॅलिन यांचे चिरंजीव उधयनिधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. डीएमकेने मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवून प्रचंड विजय मिळवला आहे.

दरम्यान, आजच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कोरोना आपत्तीला विचारात घेऊन एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्यानुसार खाजगी इस्पितळांमध्ये कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे तसेच गरीब कुटुंबांना ४ हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्यात डीएमके-काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दिवशीच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

 

News English Summary: Kudos to TN CM @mkstalin for ordering that the State Govt will bear the cost of treatment of Corona patients in Private hospitals. He is also giving ₹4,000 to all poor families. DMK-Congress alliance is fulfilling its promises on Day 1. Is Modi giving even One Rupee in relief? said congress leader Srivatsa

News English Title: Tamilnadu state govt will bear the cost of treatment of Corona patients in Private hospitals news updates.

हॅशटॅग्स

#Tamil Nadu(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x