29 June 2022 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

फडणवीस साहेब! अशाच कामगिरीचा सल्ला मोदींच्या गुजरात भाजपला सुद्धा द्यायचा होता

मुंबई : काल मुंबई सांताक्रूझ येथे भव्य ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युपीचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान, उपस्थित उत्तर भारतीयांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.

त्यावेळी फडणवीस म्हणाले की, युपी ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवासातील चौदा वर्षे नाशिकच्या पंचवटीत व्यतीत केली. त्यामुळे यूपी आणि महाराष्ट्राचे हजारो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. तसेच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत. मात्र, मागील साडेचार वर्षे आमच्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यांना कोणी सुद्धा धमकावले नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केला. तसेच योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित मुंबईतील उत्तर भारतीय लोकांना आवाहन केले की, ‘आपली मातृभूमी असलेल्या उत्तर प्रदेशा विसरू नका. तुमचे स्किल उत्तर प्रदेश मध्ये आणा आणि उत्तर प्रदेश सर्वोत्तम बनवा’ असे म्हटले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचा मुख्य रोख हा केवळ मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर होता.

दरम्यान, राज ठाकरे जरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असले तरी महाराष्ट्र सैनिक मात्र विरोधकांना झोडपून काढण्यात तेवढेच पुढे येत आहेत. कारण, मनसेचे पालघर येथील महाराष्ट्र सैनिक आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले तुलसी जोशी यांनी फडणवीसांना चांगलीच चपराक दिली आहे. त्यांच्या पोस्ट वरून भाजपचा तिळपापड होण्याची शक्यता आहे, असंच म्हणावा लागेल.

तुलसी जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे की, ‘फडणवीस साहेब! तुम्ही उत्तर भारतीयांवरील हल्ले आणि धमक्या रोखण्याची जी भव्य कामगिरी केली आहे, तशीच भव्य कामगिरी करण्याचे सल्ले सन्माननीय मोदींच्या गुजरात’मधील भाजप सरकारला सुद्धा द्यायचे होते. कारण तिथे तर १-२ दिवसात लाखो उत्तर भारतीयांना पिटाळून-पिटाळून गुजरातबाहेर जाण्याचा धमक्या देण्यात आल्या आणि ज्यांनी ऐकले नाही त्यांना थेट चोप देऊन संपूर्ण गुजरात ‘उत्तर भारतीय मुक्त’ करण्यात आले. गुजरात भाजप सरकारच्या त्या भव्य कामगिरीचा उल्लेख सुद्धा कालच्या मुंबईमधील ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळाव्यात करायचा होता. मनसेला पुढे करून अजून किती दिवस असे उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राज्याची अस्मिता गहाण ठेवणार? कारण त्यासाठी तुम्ही तर प्रभू श्रीराम जे समस्त भारताचे दैवत आहेत, त्यांच्यावर सुद्धा केवळ मतांसाठी उत्तर भारतीय असल्याचा शिक्का मारत आहात. याआधी सुद्धा घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या दिवशी एका आमदाराला तुम्ही भाजपचे आधुनिक हनुमान म्हणाला होता आणि नंतर तुमच्या त्या आधुनिक हनुमानाने महिलांचा अनादर करून काय दिवे लावले ते देशाने पहिले. जर कालच्या मेळाव्यात मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असे आवाहन करत आहेत की ‘आपली मातृभूमी असलेल्या उत्तर प्रदेशला विसरू नका. तुमचे स्किल उत्तर प्रदेश मध्ये आणा आणि उत्तर प्रदेश सर्वोत्तम बनवा’. मग तुम्ही का इथल्या पायाभूत सुविधांचा विचार आणि शहराची क्षमता यावर न बोलता वायफळ मुद्यांना खतपाणी घालता? केवळ मतांसाठी? आधी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने कुठेतरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची अस्मीता जिवंत ठेवा ही विनंती……आमच्या राज साहेबांची मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रति असलेली प्रामाणिक तळमळ तुमच्या मत पेटीसाठी वापरू नका….. आमचा अधिकृत आणि प्रामाणिक उत्तर भारतीयांना कधीच विरोध नव्हता हे ध्यानात घ्यावे…. कारण तसे होत असेल तर माझ्या राज साहेबांचं ‘उत्तर भारतीय पंचायतीतील’ तेच वाक्य पुन्हा बोलेन…. ‘नाहीतर आम्ही आहोतच’

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x