12 December 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

बारामतीत कमळ फुलवण्याच्या स्वप्नात नागपूरातच कमळ कोमजलं | अमृता फडणवीसांचे भाजपसाठी ट्विट

Amruta Fadnavis, MLC election 2020 result, MahaVikas Aghadi

मुंबई, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे. राज्यात सत्ता आल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बारामतीत कमळ फुलविण्याचा इच्छा इतकी मोठी होती की त्या नादात नागपुरात कमळ कधी कोमजलं त्याचा पत्ता फडणवीसांना देखील लागला नसावा. त्यामुळे एकमेकांना धीर देणारे ट्विट सध्या सुरु झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचा पुणे आणि नागपूरमध्ये पराभव झाला असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या वाट्याला यश आले आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की वाईट सुरुवात झाली त्याचा शेवट चांगलाच होतो, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली हार मानत शिवसेनेला मात्र टार्गेट केल्याचे दिसले आहे. आमची एख जागा आली त्यांची एकही जागा आली नाही. शिवसेनेला आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असा टोला फडणवीसांनी लगाला आहे. तर चंद्रकांत पाटील असं म्हणाले की हिंमत असेल तर एकटे लढून दाखवा. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचे वातावरण जरी असले तरी आता भारतीय जनता पक्षाचे आणि महाविकास आघाडिचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आहे.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party has lost in Pune and Nagpur and the NCP and the Congress have won. Opposition leader Devendra Fadnavis’ wife Amrita Fadnavis tweeted that a bad start is a good end, tweeted Amrita Fadnavis.

News English Title: Amruta Fadnavis twit after MLC election 2020 result news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x