27 July 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना यश, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची नायब तहसीलदार पदी नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे मागील दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्नं सुरु होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.

एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला त्याच्या हक्कासाठी सरकार दरबारी दीर्घकाळ ताटकळत ठेवणे नवीन नाही. यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय खेळाडूंबद्दल सरकारी अनास्था पाहायला मिळाली आहे. प्राजक्ता सावंत ही २०१० आणि २०११ मधील राष्ट्रीय बॅडमिंटन विजेती आहे.

राज्य सरकारच्या दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय तिने अखेर अमित ठाकरेंकडे मांडून, त्यांना पुढाकार घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या खेळ मंत्रालयाचे मंत्री म्हणून विनोद तावडेंची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती विनोद तावडेंना केली होती.

त्याप्रमाणे अखेर प्राजक्ता सावंतची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली मागणी मार्गी लागली असून, सरकारकडून तिची नायब तहसीलदार पदी नियुक्ती करत तिला नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x