14 December 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार | तशी वेळच आता आली आहे - नाना पटोले

Nana Patole

मुंबई, २० सप्टेंबर | काँग्रेस पक्षातील दोन मंत्र्यांचे घोटाळे लवकरच आपण बाहेर काढणार आहोत असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्याला “कर नाही, त्याला डर कशाला” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार, तशी वेळच आता आली आहे – We are ready to expose scam made during Fadnavis government says Nana Patole :

भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोप केले जात आहेत. मात्र, आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांचा कुठलाही दोष नाही. त्यामुळे आम्ही आरोपांना घाबरत नाही. आघाडी सरकारसमोर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, हे महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष दूर करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने आरोप केले जात असल्याचे पटोले यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआय अशा तपास यंत्रणा आपल्या हाताशी धरून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. केंद्र सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

किरीट सोमय्यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत. त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील. सोमय्या जे कागद घेऊन फिरत आहेत ते जुनेच आहेत, असं सांगतानाच सोमय्यांना साधं निवडणुकीचं तिकीटही भाजपनं दिलं नव्हतं, असा चिमटाही त्यांनी काढला.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार:
भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे, असं पटोले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असंही ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: We are ready to expose scam made during Fadnavis government says Nana Patole.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x