मुंबई : मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
त्याच रहिवाश्यांनी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या समस्या सांगितल्या. परंतु सरकारकडून कोणती सुद्धा हमी देण्यात येत नसल्याने अखेर त्यांनी राज ठाकरेंकडे आपला विषय मांडला. राज ठाकरे यांनी सर्व रहिवाशांना, ‘तुम्हाला आहात त्याच ठिकाणी घर दिलं जाईल’ असं सांगून आश्वस्त केलं आहे.
दरम्यान येत्या रविवारी स्वतः राज ठाकरे वांद्र्याच्या कम्युनिटी हॉल शासकीय वसाहत येथे रहिवाशांना प्रत्यक्ष भेटून संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राज ठाकरे प्रत्यक्ष ठिकाणी काय भूमिका घेतात ते पाहावं लागणार आहे.
