20 May 2022 9:39 AM
अँप डाउनलोड

प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी.

मुंबई : प्रकाश मेहता यांच्या विरोधात पालकमंत्री पदावरून अनेक तक्रारी येत होत्या आणि आज अखेर प्रकाश मेहता यांची रायगडच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली. रागयड मधील सावित्री नदी वरील दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट होती. अगदी त्यावेळेपासूनच त्यांच्याकडून रायगडचं पालकमंत्री पद काढून घेण्यात यावं अशी प्रतिक्रिया येत होती.

रायगडचे पालकमंत्री असूनही ते जिल्ह्यातील सर्वच कामांच्या बाबतीत उदासीन होते, किंबहुना जिल्यातील सर्वच प्रश्नांबाबत ते अगदी कानाडोळा करत होते. अगदी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सुध्दा त्यांनी गांभीर्याने घेतला नाही.

प्रकाश मेहता यांना हटवून त्याजागी आता डोंबिवलीचे आमदार आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्याकडे ग्राहक संरक्षण, बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान खात्याची देखील जवाबदारी आहे. परंतु रविंद्र चव्हाण यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#Prakash Mehata(4)#Ravindra Chavan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x