उस्मानाबाद : आज दसऱ्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्थानिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, उस्मानाबादमध्ये त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निबाळकर यांच्यासोबत होणार आहे. युतीच्या सत्ताकाळात उस्मानाबादमध्ये एकही फलदायी प्रकल्प न आल्याने शिवसेनेविरोधात स्थानिकांमध्ये रोष आहे. तसेच राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सत्तेत असून देखील शिवसेना आणि भाजपने उस्मानाबादकरांचे प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
माजी गृहमंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील यांचे ते चिरंजीव असून, उस्मानाबादमधील साखर सम्राट तसेच मोठं राजकीय प्रस्त म्हणून त्यांची मराठवाड्यात ओळख आहे. शरद पवार कुटुंबियांचे नाते संबंध असल्याने ते राष्ट्रवादीत त्यांचा मोठा दबदबा राहिलेला आहे.
