13 December 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही - राज ठाकरे

Raj Thackeray, Corona Crisis

मुंबई, ३१ जुलै : राज ठाकरे यांनी एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात अनेक विषयावर भाष्य केलं आहे . कोरोना आपत्तीच्या बाबतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

“सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मी पुन्हा कधीही मास्क वापरला नाही. त्यावेळी मला प्रश्न विचारणाऱ्या मास्क घातलेल्या १२० पैकी ५५ पत्रकारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, असंही ते म्हणाले.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, अनेकांचे व्यवसाय बुडाले. सरकराच्या कामाची पद्धत कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं हे माहित नाही. परंतु राज्यातील जनतेला वेठीस धरणं योग्य नाही,” असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. “बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या परप्रांतियांची नोंद ठेवायला हवी. ज्या कंपन्यांमध्ये रिकाम्या जागा आहेत, तिथे मराठी मुलांना प्राधान्य द्या,” असंही राज ठाकरे म्हणाले. तसचं मनसेच्या प्रतिनिधींनी अनेक कंपन्यांशी संवाद साधल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही,” असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

 

News English Summary: Government restrictions, news on television and messages on WhatsApp have created a climate of fear among citizens. You need to be careful, but it is not right to be scared. Therefore, undo everything, demanded MNS president Raj Thackeray.

News English Title: You need to be careful but it is not right to be scared said Raj Thackeray News latest updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x