28 March 2024 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई, ३१ जुलै : राज ठाकरे यांनी एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात अनेक विषयावर भाष्य केलं आहे . कोरोना आपत्तीच्या बाबतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही,” असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

अयोध्येतील भूमिपुजनाबाबत राज ठाकरे म्हणाले की सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकं त्या मानसिकतेत नाहीत आणि त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन थोडं थांबून आणि धुमधडाक्यात होणं गरजेचं होतं. कारण हा संबंध हिंदुस्थानच्या आस्थेचा विषय असल्याने तो कोरोनामुळे उद्भवलेल्या भीतीच्या वातावरणात आयोजित करणं योग्य नव्हतं असं म्हटलं. तसंच साकारणे थोडं थांबून धुमधडाक्यात ते करणं गरजेचं होतं, ज्यामुळे लोकांनाही त्याचा आनंद अनुभवता आला असता.

 

News English Summary: I saw Chief Minister Uddhav Thackeray on TV, I did not see the administration. We will not talk about it, “said MNS president Raj Thackeray.

News English Title: MNS Chief Raj Thackeray criticized Chief Minister Uddhav Thackeray over virtual meeting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x