15 December 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुळ घरी परतण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने कामगारांची गर्दी

Corona Crisisi, Covid 19

मुंबई, १४ एप्रिल: देशभरात लॉकडाऊन सुरु असताना आणि कोरोना व्हायरसची दहशत असताना मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुळचे उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते.

पंतप्रधानांनी २१ दिवसांपूर्वी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता ३ मे रोजी लॉकडाऊन शिथिल केला जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे घरी जाण्याची आशा मनी बाळगून आलेल्या या कामगारांचा उद्रेक यावेळी उडाल्याचं पाहायला मिळालं.

सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हजारो मजुरांनी वांद्रे स्टेशनबाहेर जमा होत ठिय्या दिला व आम्हाला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. सुमारे दीड तास या मजुरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. ही स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम आवाहन केले. त्यानंतर सौम्य लाठीमारही केला. तुम्ही जिथे आहात तिथेच राहणं तुमच्या हिताचं आहे. राज्य सरकार तुमची सर्व व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करणार आहे, असे सांगत पोलिसांनी लोकांची समजूत घातली.

लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वेसेवा ठप्प आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच अन्य राज्यांतून रोजगारासाठी मुंबईत आलेले हजारो मजूर मुंबईत अडकून पडलेले आहेत. आज मध्यरात्रीनंतर किमान राज्यांच्या सीमा उघडतील वा इथे अडकलेल्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा अनेकांना होती.

 

News English Summary: Thousands of laborers gathered outside Bandra station around 4 pm and demanded that we be allowed to go to the village. About an hour and a half, these laborers start their agitation. Additional police were called in to prevent the situation. Police first appealed to the crowd to be controlled. Subsequently, he made gentle sticks. It is in your best interests to stay where you are. The state government is making all your arrangements and will continue to do so, police said.

News English Title: Story Mumbai crowd laborers gathered at Bandra station to way back home amid Corona virus outbreak Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x