26 April 2024 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पुण्यात काही तासांतच ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू; पण इतर कारणही समोर

Covid19, Corona Crisis Pune

पुणे, १४ एप्रिल: राज्यात सर्वात आधी करोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे. आधी रुग्णांची संख्या वाढत असताना काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, मागील आठवडाभरापासून करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील २७ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली होती. १२ एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो मद्याचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला.

तसेच, घोरपडी येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २ एप्रिलला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. कोंढव्यातील एका ४० वर्षीय महिलेला दम्याचा आजार होता. तिलाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना दमा आणि मधुमेह होता. त्यांचाही आज मृत्यू झाला.

ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या चार मृत्यूमुळे ससूनमधील एकुण मृत्यूचा आकडा २९ वर पोहचला आहे. जिल्ह्यातील एकुण ३८ मृत्यूपैकी पिंपरी चिंचवड, बारामती, अहमदनगर व ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उर्वरीत ३४ मृत्यू आहेत.

 

News English Summary: Death row has begun in Pune, which was first spearheaded by Karuna in the state. Earlier, when the number of patients was increasing, some patients were healed and returned to Pune. However, the death toll for coronary patients has increased over the past week. Four patients were treated in Sassoon on Tuesday. Four more have been infected.

News English Title: Story corona virus 4 Covid 19 patients die today in Pune death total reaches 38 Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x