14 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

राम मंदिराचं भूमिपूजन थोडं थांबून धूमधडाक्यात होणं गरजेचं होतं - राज ठाकरे

Majha Maharashtra, Majha vision 2020, MNS Chief Raj Thackeray, vision

मुंबई, ३१ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना आपत्तीच्या काळात होणाऱ्या याच भूमिपूजनावरून देशभर चर्चा रंगली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजनाचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्ववादी संघटना आणि समर्थकांनी जोरदार टीका केली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांनी एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात याच विषयावर भाष्य केलं आहे . राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

अयोध्येतील भूमिपुजनाबाबत राज ठाकरे म्हणाले की सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकं त्या मानसिकतेत नाहीत आणि त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन थोडं थांबून आणि धुमधडाक्यात होणं गरजेचं होतं. कारण हा संबंध हिंदुस्थानच्या आस्थेचा विषय असल्याने तो कोरोनामुळे उद्भवलेल्या भीतीच्या वातावरणात आयोजित करणं योग्य नव्हतं असं म्हटलं. तसंच सरकारने थोडं थांबून धुमधडाक्यात ते करणं गरजेचं होतं, ज्यामुळे लोकांनाही त्याचा आनंद अनुभवता आला असता.

 

News English Summary: Raj Thackeray has commented on this subject in ABP My My Maharashtra, My Vision. Raj Thackeray said, “We have been watching all these things since March 23. At first no one expected it. Today when we look at all the statistics.

News English Title:  Majha Maharashtra Majha vision 2020 MNS Chief Raj Thackeray vision News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x