27 July 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

सचिन वाझे प्रकरणातील गुन्हेगार रियाझ भाटीसोबत आशिष शेलार यांचे फोटो | माध्यमांसमोर प्रिंट आणल्या नाहीत

BJP MLA Ashish Shelar with Riyaz Bhati

मुंबई, १० नोव्हेंबर | रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव आहे. तेव्हापासून तो गायब आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? असा आमचा संशय आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तसेच रियाज भाटी यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतचे फोटो दाखवून शेलार यांनी एकच (BJP MLA Ashish Shelar with Riyaz Bhati) खळबळ उडवून दिली.

BJP MLA Ashish Shelar with Riyaz Bhati. Discussions have started on social media that he forgot to take a photo of himself and Riaz Bhati while showing a photo print with the leaders of Mahavikas Aghadi :

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रियाझ भाटीबाबतचे नवे खुलासे केले. पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. फोटोवरूनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. फोटो दाखवून कुणालाही बदनाम करण्याचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर तुमच्याकडे चार बोटं येतील, असा इशाराच त्यांनी दिला.

फोटो दाखवून कोणालाही बदनाम करु नका’
रियाज भाटीचा त्यांनी उल्लेख केला. आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाज भाटी यांचा काहीही संबंध, संपर्क नाही. फोटोवरुनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी दाखवणार नव्हतो पण मग हे सगळे फोटो पाहाच..’ (शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत रियाज भाटीचे फोटो असल्याचे शेलारांनी दाखवले)

‘मला वाटतं कोणाचीही नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करु नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर चार बोटं तुमच्याकडे येतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी यांचा रियाज भाटीशी काहीही संबंध नाही.’ असंही आशिष शेलार यावेळी म्हणाले.

शेलारांनी स्वतःचे फोटो माध्यमांसमोर आणले नाहीत:
रियाझ भाटी’चे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत, सेलिब्रिटी, क्रिकेटर्ससोबत फोटो आहेत. आशिष शेलार यांनी गूगल करून महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच्या फोटो प्रिंट दाखवताना स्वतःचे आणि रियाझ भाटीसोबतचे प्रिंट काढायला विसरले अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MLA Ashish Shelar with Riyaz Bhati photo viral on social media.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x