27 July 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Pankaja Munde To BJP Leader | आघाडी सरकार पडतंय की राहतंय पेक्षा विरोधकांनी सक्षमपणे काम करावे - पंकजा मुंडे

Pankaja Munde To BJP Leader

मुंबई, १८ ऑक्टोबर | मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. फडणवीस म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. मात्र राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या उतावळ्या (Pankaja Munde To BJP Leader) नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या सकाराम्तक सल्ला दिला आहे.

Pankaja Munde To BJP Leader. It doesn’t matter to us whether the Mahavikas Aghadi government in the state runs or falls. BJP leader Pankaja Munde on Sunday advised the opposition to work for the people :

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चालते की पडते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. विरोधकांनी जनतेसाठी काम करणे महत्त्वाचे, असा सल्ला देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला रविवारी घरचा आहेर दिला.

पंकजा रविवारी सकाळी मुंबईत बोलत होत्या. दिल्ली दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, पक्षाच्या सचिवांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. त्यासाठी आपण दिल्लीला चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले. सरकार पडणार आहे, असे सारखे आम्ही विरोधक म्हणू लागलो तर कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जाईल. कार्यकर्ते सक्रिय राहणार नाहीत. तसेच विरोधक म्हणून आमचे काम सक्षमपणे चालले आहे, असे त्यांनी सांगितले. पंकजा बीडच्या पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही, असा आरोप आहे. यावर हे जनताच ठरवेल असे त्या म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Pankaja Munde To BJP Leader over repeated statements regarding MahaVikas government.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x