27 June 2022 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा, नंतर राज्यव्यापी स्वरूप

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात मोठा दुष्काळ पडला आहे. परंतु, राज्यातील युती सरकार शेतक-यांच्या सर्व प्रश्नांकडे पूणर्पणे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आता राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याने हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पत्रकार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये प्रचंड मोठा दंडुका मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येईल, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.

आज दुपारी राजगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे सरचिटणीस अनिल शिदोरे, नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष करत आहे, याची माहिती पत्रकारांना दिली. फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी विविध तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे अधिकृतपणे जाहिर केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तालुक्यात केवळ दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर न करता थेट “दुष्काळ” जाहिर करावा अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती जरी जाहिर केली असली तरी त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप मनसेने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ जाहिर करून सुद्धा फडणवीस सरकारकडून योग्य उपाययोजना राबवल्या जात नसल्याने बळीराजा अजून संकटात ढकलला जात असून, त्यांच्यामध्ये सरकार विरोधात संतापाची लाट आहे असं मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.

तसेच दुष्काळ परिस्थितीची कोणतीच माहिती सध्या सरकारकडे नाही. खरीप हंगाम असतानाच सर्व गोष्टींची कल्पना राज्य सरकारने शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. परंतु, राज्य फडणवीस सरकार याची कोणतीही माहिती देत नसल्याची खरमरीत टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेत केली आहे. आणि त्यासाठीच झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येईल. तसेच त्यानंतर पक्षातर्फे राज्यव्यापी मोर्चे काढले जातील. दरम्यान, ज्या तालुक्यात शेतक-यांना दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा तालुक्यात मनसेकडून भव्य मोर्चे काढण्यात येतील असे सावंत यांनी स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x