2 December 2022 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला Budh Rashi Parivartan | 3 डिसेंबरला बुध राशी परिवर्तन, हा परिवर्तन काळ या 4 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरेल Guru Gochar 2023 | 2023 मध्ये गुरुची या 6 राशींच्या लोकांवर विशेष कृपा राहील, भाग्याचे दार खुले होईल, तुमची राशी आहे? Nippon Mutual Fund | कडक! निप्पॉन म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 170 ते 300 टक्के परतावा देत आहेत Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ Horoscope Today | 03 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

शिंदेंचं बंड स्वबळावर नव्हे तर भाजप पुरस्कृत | कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात निवडणुका होतील

Former Shivsena MP Anant Gite

Anant Gite | आज शिवसेनेचे माजी खासदार अनंत गितेंनी मोठं वक्तव्य केलं होतं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजप रचित हे बंड :
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार जरुर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी केली.

आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता :
पुढे गिते म्हणाले ”घराघरांत कलह आहेत, वाद आहेत आणि आपली आई संकटात असेल तर आपण कलह करत बसणार नाही, तर आईला वाचवणार. आज शिवसेना संकटात आहे, ही आपली आई संकटात आहे. आपल्याला आईला वाचवायचं आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता आहे, आणि ही आई आज संकटात आहे, तिला आपल्याला वाचवायचं आहे.”

उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे :
उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे, आणि यामध्ये या गद्दारांना गाडून टाका” असेही गिते म्हणाले आहेत. एकनाथ शिदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानतंर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मागच्या काही काळापासून संघर्ष चालू आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना संबोधित करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former Shivsena MP Anant Gite criticized rebel of Eknath Shinde check details 23 July 2022.

हॅशटॅग्स

#Anant Gite(1)#Ekanth Shinde(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x