26 September 2020 8:43 PM
अँप डाउनलोड

महिला ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप; भारतीय महिला टीमचे आव्हान संपुष्टात

अँटिग्वा : महिलांच्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडच्या महिला टीमकडून पराभव झाला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून इंग्लंड टीम समोर ११३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु, इंग्लंडच्या टीमने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. आता अंतिम सामान्यतर इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलिया टीमसोबत पडणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान आजच्या सामन्यात नताली सीवरने झुंजार नाबाद अर्धशतक झळकावले. मागील वर्षी सुद्धा वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या किताबी लढतीत इंग्लंडकडून पराभव झाल्याने भारतीय महिला टीमला अखेर उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे गट फेरीमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे चारही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल असलेल्या भारताचा इंग्लंड करून अखेरच्या क्षणी दणदणीत पराभव करण्यात आला. परंतु, २००९ मधील टी-20तील जगज्जेते असलेल्या इंग्लंडविरूद्ध भारतीय महिला संघांची कामगिरी अगदीच सुमार ठरली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x