15 May 2021 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार | या बड्या नेत्याचं भाकीत

Prakash Ambedkar, Presidential rule, Maharashtra, MahaVikas Aghadi

मुंबई, १२ ऑक्टोबर : राज्य सरकार सातत्याने केंद्राच्या निर्णयाला छेद देणारी भूमिका घेत आहे. घटनेनुसार राज्याला केद्र सरकारच्या विरोधात जाता येत नाही. मात्र, महाराष्ट्रात तसेच घडत आहे. त्यातून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिना सुरू होण्यापुर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं भाकित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घेत आहे. केंद्राचे कायदे नाकारले जात आहेत. देशात सध्या अनलाॅक प्रक्रिया सुरू असून अनेक निर्बंध शिथील केले जात आहेत.

केंद्र सरकारने मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. सामान्य जनतेला आजही लोकलची प्रतीक्षा आहे. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सातत्याने लाॅकडाऊन विरोधी भूमिका घेतात. लाॅकडाऊन हटवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आंदोलनेही केली. सलून बंद असताना ती उघडण्यात यावीत यासाठी अकोला येथे केस कापून घेत अभिनव आदोलन केले होते. तसेच मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील आंदोलनातही सहभागी झाले होते.

 

News English Summary: The state government has consistently taken a stand against the Centre’s decision. As a matter of fact, the state cannot go against the central government. However, the same is happening in Maharashtra. From that, a different struggle has started. Therefore, Prakash Ambedkar, the head of the deprived Bahujan Aghadi, has predicted that the President’s rule may take effect in Maharashtra before the beginning of December.

News English Title: Prakash Ambedkar says presidential rule in Maharashtra before December Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x