15 December 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Health First | चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

Warts removal, home remedies, health article

मुंबई, १५ मार्च: शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरिरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही घरगुती उपायाने या चामखिळी घालवता येतात. त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींकर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात.

उतार वयामध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे त्वचेवरील चामखीळ. शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरीरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही वेळेस शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चामखीळ काढून टाकतात. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा शरीरावर चामखीळ येतात. चामखीळला मोस म्हणून देखील ओळखले जाते. चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय..

सफरचंदचं व्हिनेगर:
मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुकत जाईल.

लिंबाचा रस:
लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

बटाट्याचा रस:
बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

अननसाचा रस:
मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

बेकिंग सोडा:
चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

लसून:
लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

 

News English Summary: Many health problems arise in old age. One of them is warts on the skin. Warts are caused by a specific type of virus in the body. Although they are not dangerous for the body, it spoils the beauty of the body. Sometimes warts are removed through surgery. But after a few days, warts appear on the body again. Warts are also known as moss. Here are some home remedies to get rid of wart problem

News English Title: Warts removal home remedies health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x