15 December 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

वृक्षतोडूवरून सेनेवर कमिशनचा आरोप; पण फडणवीस सरकारच्या आरे वृक्षतोडीवरच भ्रष्टाचाराचं वलय?

Save Aarey, Save Forest, Amruta Fadnavis

मुंबई: मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण २०११ झाडं तोडण्यात आली. मात्र त्यासाठी फडणवीस सरकारने तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. म्हणजे सदर आकडेवारीनुसार एक झाड तोडण्यासाठी एकूण १३, ४३४ रुपये एकदा खर्च करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी आरेतील वृक्षतोडीसाठी नेमका किती खर्च करण्यात आला, याबद्दलची सविस्तर विचारणा माहिती अधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीएलकडे केली होती. त्यानंतर सदर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

सदर वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा आणि जागृत मुंबईकरांच्या कडाडून विरोध होता. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर संबंधित याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच मध्यरात्री अचानक झाडांची कत्तल करण्यात आल्यानं पर्यावरणप्रेमींनी सरकारला धारेवर धरलं होतं आणि शहरात मोठं तणावाचं वातावरण झाल्याने कर्फ्यू देखील लावण्यात आला होता. सरकारे गुप्तता पाळल्याने या वृक्षतोडीसंदर्भातील खर्चाची सविस्तर माहिती भंडारेंनी एमएमआरसीएलकडे मागितली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांमध्ये तोडलेल्या २,०११ झाडांसाठी तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची आकडेवारी भंडारेंना एमएमआरसीएलनं दिली. त्यामुळे या वृक्षतोडीमध्ये देखील घोटाळा झाला असल्याची चर्चा पर्यावरण प्रेमींमध्ये रंगली आहे आणि त्यात सदर माहिती देण्यात देखील सदर यंत्रणेने नियमापेक्षा अधिक काळ घेतल्याने संशय अधिक बळावला आहे.

तत्पूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला होता. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले होते. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती.

अमृता फडणवीस यांनी औरंगाबादमधील वृक्षतोडीकडे लक्ष वेधून शिवसेनेचं वृक्ष प्रेम बेगडी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात १७ एकर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. या स्मारकासाठी शासनाकडून ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या स्मारकाच्या आड एक हजार झाडं येत असल्याने ही झाडं तोडण्यात येणार असल्याची समोर आल्याने अमृता फडणवीस यांनी ट्विटकरत ठाकरे सरकारवर आणि शिवसेनेवर कमिशनचे आरोप केले होते.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना १ हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल होतं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरच्याच माध्यमातून सडेतोड प्रतिउत्तर दिलं होतं. ‘सॉरी, तुमचा अपेक्षाभंग झाला. पण एकही झाड कापलं जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट वेल सून,’ असा टोला प्रियंका यांनी अमृता फडणवीस यांना लगावला होता. मात्र आता मुंबईतील आरे कॉलनीत झालेल्या वृक्षतोडीसंदर्भातील आरटीआय अंतर्गत माहितीवरून अमृता फडणवीसच कात्रीत सापडल्या आहेत असंच म्हणावं लागेल.

 

Web Title:  Two crore 70 lakh Rupees Spend Tree Mumbai Aarey Colony Metro Carshed Sutting Reveals Under RTI

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x