29 May 2023 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील Numerology Horoscope | 29 मे 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 29 मे 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sharad Pawar Target BJP | ईडी वगैरे काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही - शरद पवार

Sharad Pawar Target BJP

पिंपरी, १७ ऑक्टोबर | राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांना नेमका का त्रास दिला जातोय याचं नेमकं कारण (Sharad Pawar Target BJP) सांगितलं आहे. “महाराष्ट्र सरकारमधील अनेकांना प्रचंड त्रास दिला. मात्र काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊद्या पण सरकार पडणार नाही,” असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Target BJP. NCP’s President Sharad Pawar strongly criticized the Central Government and the Bharatiya Janata Party. Also, the exact reason why the family of Deputy Chief Minister Ajit Pawar is being harassed has been stated :

शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ईडी, आयकर विभाग तसेच सीबीायच्या धाडसत्रावर भाष्य केलं. “आधी ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागाच्या माध्यमातून इतरांना त्रास दिला. आता अजित पवार यांच्या बहिणींना त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधील अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे समजल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊ द्या. हे सरकार पडणार नाही,” असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, “आता सत्ता त्यांच्या हातात आहे. म्हणून ते काहीही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे. महाराष्ट्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांमार्फत त्रास दिला जातो,” असा आरोपदेखील पवार यांनी केला.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Sharad Pawar Target BJP over misuse of ED against MahaVikas Aghadi leaders.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(427)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x