3 July 2020 4:25 PM
अँप डाउनलोड

मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा: आमदार नितेश राणे

MLA Nitesh Rane, MP Narayan Rane, Nilesh Rane, Maratha Kranti Morcha, Maratha Community Reservation

कोल्हापूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने वैद्यकीय प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा, अन्यथा मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा महासंघाने पत्रकाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षण २०१८ मध्ये लागू झाले आहे. पूर्वलक्षी वैद्यकीय प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू असताना मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा कोटा देऊ नये यासाठी काही विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणानंतर जानेवारी २०१९ मध्ये केंद्रात व राज्यात आर्थिकदृष्टय़ा मागास आरक्षण लागू झाले आहे. परंतु, पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण लागू करता येत नाही हे याचिका करणा-या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेले नाही. याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांकडून फक्त मराठाद्वेषाचे राजकारण केले जात आहे. यापूर्वी मुंबई व नागपूर येथील याचिका फेटाळल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी पैसे भरून प्रवेश घेतले आहेत. या मुलांचा कोणताही दोष नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांच्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x