8 May 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी

Health Minister Rajesh Tope, Gujarat, Maharashtra,  Vaccination

मुंबई, ८ एप्रिल: आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्ष वर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?”, असा सवाल टोपेंनी केला आहे.

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे. औद्योगिकदृष्ट्याही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

News English Summary: Vaccination has been stopped in Satara, Sangli and Panvel in Maharashtra today. Buldhana has only today’s stock. You have also expanded the vaccination center. Harsh Vardhan’s speech does not show that he wants to oppose consciously. But why 7.5 lakh doses for a state with 50 per cent patients across the country and more for others? ”Asked Tope.

News English Title: Health Minister Rajesh Tope gives clarification on numbers comparing Gujarat and Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x