28 June 2022 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

गणेशने कुस्ती जिंकलीच आणि उपस्थितांची मनंही जिंकली!

पुणे: पिळदार शरीरयष्टी, धोबीपछाड, तरे तरेचे डावपेच आणि जोरदार आदळ-आपट अनुभवन्याचा आनंद म्हणजे कुस्ती स्पर्धा.

एकमेकांना चितपट करण्याचा कसलेल्या पैलवानांचा प्रयत्न आणि भन्नाट तावा-तावाने शक्ती पणाला लावून आणि डावपेच आखून प्रतिस्पर्धीला नामोहरम करण्याचा प्रयत्न. परंतु हे सर्व करत असताना हि कुस्तीतील खिलाडूवृत्ती आणि प्रामाणिक पणे जास्त अनुभवी स्पर्धकाला दिलेला सन्मान.

महाराष्ट्राच्या कसलेल्या कुस्तीगीराकडून आज हीच खिलाडूवृत्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०१७ मध्ये अनुभवायला मिळाली.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. प्रतिस्पर्धी विजेता पैलवान गणेश जगताप सामना जिंकल्या जिंकल्या, थेट चंद्रहार पाटीलच्या पाया पडला.

आपणच पराभूत केलेल्या पैलवानेचे आशीर्वाद घेतल्याने, उपस्थित शौकिनांनी गणेशच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं. स्पर्धा जिंकल्यावर अनुभवी प्रतिस्पर्धीच्या पाया पडून आशीर्वाद घेत गणेशने कुस्ती तर जिंकलीच पण कुस्तीमींची मनंही जिंकली.

हॅशटॅग्स

#Maharashtra Kesari 2017(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x