27 June 2022 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल Investment Planning | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील | पॉलिसीचे तपशील जाणून घ्या
x

महाराष्ट्र केसरीसाठी साठी दोन सख्य्या मित्रांमध्ये कुस्ती, फायनलमध्ये भिडणार.

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीशौकीनांना एकच उत्सुकता लागली आहे आणि ती म्हणजे यंदाचा महाराष्ट्र केसरी २०१७ बहुमान कोनाला मिळणार. पुणेकर अभिजित कटके की, अट्टल साताऱ्याचा किरण भगत ?

आज संध्याकाळी पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावात या दोन वाघानं मध्ये तुफान कुस्ती युध्द रंगणार आहे. आणि हाच आजचा संपूर्ण पुण्याचा चर्चेचा विषय झाला आहे. पण दोघेही सारख्याच ताकदीचे पैलवान समजले जातात. काय आहेत दोघांची बलस्थान ?

दोघा मित्रांनी महाराष्ट्रातील कुस्ती जगतात स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे दोघेही मित्र एकाच वयाचे म्हणजे २२ वर्षांचे आहेत.

एक आहे मॅटवरचा मातब्बर पैलवान तर दुसरा कसलेला मैदानी कुस्तीचा बादशहा.

अभिजीत कटके हा आहे मॅटवरचा मातब्बर पैलवान तर किरण भगत कसलेला मैदानी कुस्तीचा हीरो. अभिजित सलग दुस-यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी दावेदार झालाय, तर किरण माती विभागाची फायनल जिंकून, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीसाठी लढण्याचा बहुमान मिळवला आहे.

अभिजीतचं वजन तब्बल 122 किलो असून, त्या तुलनेत किरणच वजन 103 किलो आहे.

किरण भगतनं कुंडलच्या मैदानात तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला हरवण्याचा भीमपराक्रम गाजवला होता.

जसे दोघं पक्के मित्र तसेच दोघं पक्के पैलवानही बनले आहेत. महाराष्ट्र केसरी २०१७ साठी कुस्ती रसिकांना आत्ता दोस्तीत कुस्ती अनुभवयाला मिळणार आहे.

हॅशटॅग्स

Maharashtra Kesari(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x