28 May 2022 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 वर्षात 10 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 23 लाख रुपये केले Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
x

शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी ऑफर; अन्यथा भाजपची स्वबळाची तयारी?

BJP Maharashtra, Bharatiya Janata Party, Shivsena, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: शिवसेनेशी युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या असून, स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे भारतीय जनता पक्षाचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या काळात शिवसेनेने साथ दिल्याने आता विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने स्वबळावरच लढवाव्यात, अशी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते. मात्र लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मेगाभरतीने भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरीत आहेत. शिवसेनेने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मात्र, सध्या १२२ जागी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भारतीय जनता पक्षाला मान्य नाही.

विधानसभा निवडणुकीत १३५ पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला १२० जागांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात भाजपला त्यांच्या जागांची अदलाबदल हवी आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x