15 October 2019 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Devendra Fadanvis, Sudhir Mungantivar

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या आणि लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला अधिक प्रमाणात खुश करण्यावर फडणवीस सरकारचा सर्वाधिक भर असेल. पावसाळी अधिवेशनाला काल १७ जुन पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव ठेऊन आणि मंत्रीमंडळा विस्तारानंतर नवीन मंत्र्यांचे स्वागत करुन सभागृहाचे कामकाज बंद करण्यात आले. त्यानंतर, आज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०१९-२०२० चा आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी अर्थसंकल्प सादर करतील. तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दिपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या