12 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

माजी मुख्यमंत्री फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करत आहेत - पृथ्वीराज चव्हाण

CM Uddhav Thackeray, Opposition Leader Devendra Fadnavis, Prithviraj Chavan

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी ‘हिंदुओं की कबर खुदेगी’ असे नारे देताना दिसत आहेत. तसंच या व्हिडिओवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ‘अशा आंदोलनांना प्रोत्साहन देऊन शिवसेनेनं आता स्पष्ट केलं आहे की वैयक्तिक लोभांच्या बाबतीत तडजोडी करण्यास शिवसेना किती प्रमाणात खाली उतरली आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘नैराश्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण आणि बनावट माहिती पसरवणं टाळलं पाहिजे,’ असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

 

Web Title:  Former Chief Minister Prithviraj Chavan slams Opposition Leader Devendra Fadnavis over Sharing doctored Video on Social Media.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x