17 May 2021 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

अफवा न पसरविण्याच्या मोदींच्या आवाहनाकडे भाजपच्या 'तुकडे-तुकडे' गॅंगचं दुर्लक्ष? सविस्तर वृत्त

CAB 2019 Delhi Protest, Fake Video, Speeding Rumors with Doctored Video

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्या अनुषंगाने मराठी आणि हिंदी चित्रपट कलाकार रेणुका शहाणे यांनी मोदींच्या शांततेच्या ट्विटला रिट्विट करत म्हटलं होतं, “सर! कृपया तुमच्या आयटी सेल’च्या सर्व ट्विटर हॅण्डल्सला ट्विटरपासून दूर राहायला सांगा. कारण तेच सर्वाधिक अफवा, खोटी माहिती पसरवत आहेत आणि बंधुता, शांतता आणि ऐक्या बाधित करत आहेत. दशातील खरी. “तुकडे तुकडे” टोळी तुमची आयटी सेल आहे सर. कृपया त्यांना द्वेष पसरविण्यापासून थांबवा’ असं म्हणत रेणुका शहाणे यांनी मोदींना चांगलीच चपराक दिली होती.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी ‘हिंदुओं की कबर खुदेगी’ असे नारे देताना दिसत आहेत. तसंच या व्हिडिओवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ‘अशा आंदोलनांना प्रोत्साहन देऊन शिवसेनेनं आता स्पष्ट केलं आहे की वैयक्तिक लोभांच्या बाबतीत तडजोडी करण्यास शिवसेना किती प्रमाणात खाली उतरली आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘नैराश्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण आणि बनावट माहिती पसरवणं टाळलं पाहिजे,’ असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

 

Web Title:  BJP Top Leaders Speeding Rumors with Doctored Video regarding CAB 2019 Protest.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x