5 August 2021 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

महा बुलेट ट्रेन | नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरू | शेतात जाऊन पाहणी | समृद्धी महामार्गालगतचा मार्ग

Nagpur Mumbai bullet train

मुंबई, ०२ जुलै | मागील वर्षभरात गुजरातच्या फायद्याची असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने देखील राज्यातील भाजप नेत्यांमार्फत वातावरण तापवलं होतं आणि राज्य सरकार विकास विरोधी असल्याची बोंब सुरु केली होती. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकार बुलेट ट्रेन करतंय, पण गुजरातच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या फायद्याची असंच म्हणावं लागेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कारण बहुचर्चित मुंबई- नाशिक- औरंगाबाद- नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचे काम देण्यात आलेल्या ‘तुला’ या एजन्सीचे प्रतिनिधी ‌संभाव्य भूसंपादन हाेणाऱ्या शेतावर जाऊन तिथे सध्या नेमके काय आहे याची पाहणी करत आहेत. याआधी या मार्गासाठी विमानातून लिडार सर्वेक्षण झालेले आहे. समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.

केंद्र शासनाच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) देशात बुलेट ट्रेनसाठी सात प्रकल्पांची घोषणा केली आहे. या पहिल्या टप्प्यातील घोषित मार्गांमध्ये मुंबई ते नागपूर या मार्गाचाही समावेश आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी विमानातून ‘लिडार’ तंत्रज्ञानाच्या आधारे हवाई सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. त्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष प्रस्तावित मार्गाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून शेतजमिनी, डोंगर, खाणी, जंगले, तलाव, विहिरी, शेतांमध्ये असलेली पिके, झाडे यांचा डाटा गोळा करण्यात आला होता.

या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण:
आता एनएचआरसीएलने प्रत्यक्ष शेतांवर जाऊन प्राथमिक पाहणीचे काम सुरू केले आहे. हे काम पुण्यातील ‘तुला’ या एजन्सीला देण्यात आलेले आहे. ‘तुला’मार्फत औरंगाबादमधील लोकराज्य ही स्वयंसेवी संस्था औरंगाबाद, नाशिक, नगर आणि जालना या चार जिल्ह्यांत सर्वेक्षणाचे काम करत आहे. या सर्वेक्षणात शेतात सध्या कोणते पीक आहे, बांधावरील झाडे, विहिरी, बोअरवेल यांची माहिती संकलित केली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Survey started for Nagpur Mumbai bullet train will go along -Samrudhi highway news updates.

हॅशटॅग्स

#NagpurMumbaiBulletTrain(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x