28 March 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Mumbai Coastal Road Project | मुंबई कोस्टल रोडचं ४० टक्के काम पूर्ण | जुलै 2023 मध्ये खुला होण्याची शक्यता

Mumbai Coastal Road 40

मुंबई, २३ सप्टेंबर | मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्पातील (27 किमी) म्हणजे आता 40% पूर्ण झालं आहे. बीएमसीने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (27 किमी) 40% पूर्ण झालं आहे, ज्यामध्ये मलबार हिल अंतर्गत 1 किमी लांब, 40 फूट व्यासाचा बोगदा पूर्ण केल्याचं म्हटलं गेलंय. यानंतर केवळ 900 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करायचे शिल्लक आहे. 40 फूट व्यासाचा हा भारतातील पहिला सागरी बोगदा असेल अशी देखील माहिती समोर आली आहे.

Mumbai Coastal Road Project, मुंबई कोस्टल रोडचं ४० टक्के काम पूर्ण, जुलै 2023 मध्ये खुला होण्याची शक्यता – Mumbai Coastal Road 40 completed claimed to be opened for traffic in July 2023 :

पालिकेने पुढे माहिती देताना म्हटलं आहे की, ‘मुंबईतील ट्रॅफिक जामच्या समस्येवर मात करण्यासाठी बांधण्यात येणारा आठ-लेन कोस्टल रोड जुलै 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाईल. बीएमसीने दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला उत्तर मुंबईतील बोरिवलीशी जोडण्यासाठी 29.2 किमी लांबीचा समुद्रकिनारा रस्ता प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाची किंमत जवळपास 12,721 कोटी रुपये इतकी आहे.

हा प्रकल्प ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु न्यायालयातील खटल्यांमुळे विलंब झाला. मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2019 मध्ये या प्रकल्पासाठी कोस्टल रोड झोन मंजुरी नाकारल्यानंतर हा प्रकल्प ठप्प झाला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती आणि बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mumbai Coastal Road 40 completed claimed to be opened for traffic in July 2023.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x