
Lorenzini Apparels Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 554 अंकांच्या घसरणीसह 72834 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 151 अंकांच्या घसरणीसह 22221 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक देखील लाल निशाणीवर क्लोज झाले होते. ( लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनी अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स स्टॉकमध्ये आयशर मोटर्स, ओएनजीसी, टायटन, डिवीज लॅब, हिंदुस्तान युनिलिव्हर, बीपीसीएल आणि एचडीएफसी बँक शेअर्स सामील होते. तर टॉप लुजर्स स्टॉकमध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंडट्री, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि एचसीएल टेक हे शेअर्स सामील होते.
शेअर बाजारात मंदी असताना लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 27.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 429 कोटी रुपये आहे. लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.73 रुपये होती. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 27.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 1 महिन्यात लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीची स्थपना 2007 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः पुरुष आणि महिलांसाठी विविध कपडे डिझाइन करण्याचा व्यवसाय करते.
लॉरेन्झेनी ॲपेरेल्स ही कंपनी मुख्यतः फॉर्मल, सेमी-फॉर्मल आणि कॅज्युअल वेअर सेगमेंटमध्ये व्यवसाय करते. या कंपनीचे स्वतःचे अनेक आउटलेट स्टोअर्स देखील आहेत. ही कंपनी आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कपड्यांची विक्री करते. लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनी अनेक गारमेंट उत्पादन कंपन्यांसाठी थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स लाभ दिला आहे. यासाठी कंपनीने 28 मार्च हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.