15 December 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IREDA Share Price | आयआरईडीए स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर केली

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने भांडवल उभारणी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच स्टॉक एक्सचेंजने या शेअर्सच्या सर्किट फिल्टरमध्ये देखील सुधारणा केली आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.39 टक्के घसरणीसह 166.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेबीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, आयआरईडीए कंपनीचे सर्किट फिल्टर 5 टक्के वरून वाढवून 20 टक्के करण्यात आले आहे. सध्या या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,000 कोटींच्या पुढे गेले आहे. आता आयआरईडीए कंपनीचे शेअर्स एका ट्रेडिंग सेशनमध्ये कमाल 20 टक्के वाढू किंवा 20 टक्के घसरू शकतो.

आयआरईडीए कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. या IPO शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये प्रति शेअर होती. पण, त्यानंतर हा स्टॉक 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आयआरईडीए स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर 214 रुपये किमतीवर पोहचला होता.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 140 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना 140 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 210 रुपये किंमत पुन्हा स्पर्श करेल. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x