8 September 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
x

तुम्ही पालघरमध्ये माघार घ्या, आम्ही भंडारा-गोंदियात समर्थन देतो: उद्धव ठाकरे

नागपूर : भाजपने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेतल्यास शिवसेना भाजपला भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिडणुकीत समर्थन देईल असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने ही शिवसेनेची नवी राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी आज पत्रकांरांशी संवाद साधला. वस्तूता शिवसेनेने अजूनही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार दिलेला नाही, तरी सुद्धा उद्धव ठाकरे असं का म्हणाले हे पत्रकारांना समजू शकलं नाही. तसेच त्याबद्दल विचारणा केली असता, २०१९ च्या निवडणुकीची तयारी करायची की पोटनिवडणूक लढवायची अशी द्विधा मनस्थितीत पक्ष अडकल्याने अजून भंडारा-गोंदिया अजून शिवसेनेने उमेदवार दिला नसल्याचं बोललं जात आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने राजेंद्र गावित यांची उमेदवारी मागे घेतल्यास आम्ही भाजपला भंडारा-गोंदियात समर्थन देऊ असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x