15 May 2021 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

आपत्तीत भाजप समर्थक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर महाराष्ट्र सैनिक उतरले बचावात

Covid19, Corona Crisis, MNS Rupali Patil Thombare, Raj Thackeray

पुणे, १६ एप्रिल : महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच भाजपसमर्थकांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे राजीनामा द्या, अशी मागणी करत #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला होता. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा असं रुपाली पाटील यांनी सांगतिले. तसेच राज ठाकरे विनंती करत नाही तर थेट जाळ काढतात असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.

राज आणि उद्धव या दोन बंधूंमधील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच होते. मात्र आता कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं. तसंच उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधन करत असताना सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. ‘राज आहे…पवार साहेब आहेत..सोनिया गांधी…अमित शहा हे सगळेच या लढाईत आपल्यासोबत आहेत,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं टाकली जात आहेत, वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे. वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे, कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्षांना आवाहन करतो की, राजकारण लोकशाहीत चालतच असतं, पण ही वेळ राजकारणाची नाही, देशावर गंभीर संकट आहे अन् प्रशासनावर ताण आहे, जे एकत्रितपणे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा, पक्ष विसरून सरकारला मदत करा, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.

 

News English Summary: While Corona’s crisis is waning on the country including Maharashtra, political allegations are also underway. BJP leaders in the state have come under heavy criticism of Chief Minister Uddhav Thackeray after a crowd of foreign workers gathered in the Bandra area of ​​Mumbai. Also, BJP supporters took to Twitter to urge Uddhav Thackeray to resign, following the trend #UddhavResign. In this backdrop, the political environment is changing, while Rupali Patil Thombre, the woman officer of MNS of Raj Thackeray has taken an aggressive role.

News English Title: Story MNS leader Rupali Patil has warned those who criticize Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1365)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x