13 December 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

त्र्यंबकेश्वर: जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ, गावं जलमुक्त होण्याच्या मार्गावर

Devendra Fadanvis, BJP, Shivsena, Udhav Thackeray

त्र्यंबकेश्वर: तालुक्यात मागील ४ वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, परंतु आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.

तालुक्यातील १२४ गावांपैकी ५६ गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यामध्ये जलसंधारणाची १५५४ कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वनतळे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, दगडी बांध, चारी खोदणे असे पाणी अडवण्यासाठी कामे करण्यात आली आहेत. असे असतानादेखील भूजल पातळी खालावलेली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा अल्प म्हणावा इतका कमी झाला आहे, तर लहान बंधारे कधीच कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे गावात सध्या तीव्र दुष्काळाचा सामना करताना स्थानिक लोकं चांगलेच होरपळून निघत आहेत. त्यात जिथे कामं झाली तेथे देखील पाऊस पडून सुद्धा पाण्याचे नियोजन झाले नसल्याने या योजना केवळ पैसे खाण्याचे कुरण बनल्याचा गावकरी आरोप करत आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार जाहिरातीत दाखवत असलेली जलयुक्त शिवाराची स्थिती आणि प्रत्यक्ष वास्तव अत्यंत भीषण असल्याचं समजतं.

तालुक्यात झालेली जलयुक्त शिवारची कामे

वर्ष … गावे….कामांची संख्या

  1. २०१५-१६… १९ … ८२६
  2. २०१६-१७… ९ … २३२
  3. २०१७-१८… ५ … १५०
  4. २०१८-१९….२२… ३४६

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x