26 May 2022 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुंढेंची बदली झाल्याच्या आनंदाने भाजपाचा फटाके फोडून आनंदोत्सव

नाशिक : कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या निमित्ताने नाशिक भाजपने फटाके फोडून दिवाळी साजरी केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावानेच मुंढे यांची अवघ्या ९ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान स्थानिक भाजपने राजकारण केले असले तरी स्थानिक नागरीकांनी आज मुंढेंच्या बदलीला तीव्र विरोध करत त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे. आज स्थानिक नागरिकांनी सकाळपासूनच तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा परिसर ‘वुई वॉन्ट मुंढे’ अशा घोषणांनी दणाणून सोडला होता.

काल सुट्टी असताना सुद्धा तुकाराम मुंढेंची बदली कशी करण्यात आली? असा थेट सवाल उपस्थित नागरीकांनी विचारला. तर भारतीय जनता पक्षाचं सरकार मुजोर आहे, अशा तिखट शब्दांत उपस्थित नागरीकांनी भाजपाविरोधात रोष व्यक्त केला आहे. त्यात आप पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश होता. असं सर्व सकाळपासूनच वातावरण असताना दुसरीकडे तुकाराम मुंढेंची बदली झाल्याची बातमी कानावर येथेच स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. हद्द म्हणजे सकाळी नाशिकच्या महापौर निवासस्थानी रामायण बंगला येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(688)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x