पुणे, ०५ ऑगस्ट | पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुन अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. तसेच कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनिषा कायंदे यांनी भाष्य केलं.

मनिषा कायंदे काय म्हणाल्या:
आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतेही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी,” असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकार कधीही पडेल:
माविआ सरकार विक आहे. हे केव्हा पडेल माहीत नाही. जे नेते आज दिल्लीत भेटत आहेत, ते आधीपासूनच भेटत आहेत. अचानकपणे त्यांची भेट होत नाहीये. या भेटीवरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. महाराष्ट्राचे ‘राज्यपाल निष्ठावंत’राज्यपालांसारखे निष्ठावंत, कर्तृत्ववान व्यक्ती मी कधीही पाहिलेला नाही. राज्यपालांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून राग आहे. पण असे व्हायला नको, असेही यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena spokesperson Manisha Kayande slams Amruta Fadnavis news updates.

नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य, सध्या कोणतेही काम नसल्याने भाजपने त्यांना प्रमुख प्रवक्तेपद द्यावं – मनिषा कायंदे