24 May 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Navi Mumbai, BJP corporator Tanuja Madhavi, Joined NCP

नवी मुंबई, २५ जानेवारी: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका तनुजा मढवी या प्रभाग क्र 83 च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या. परंतु अंतर्गत वादामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांआधीही काही नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली. त्यामुळे नवी मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि गणेश नाईकांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता.

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

 

News English Summary: In the run up to the upcoming municipal elections, the Bharatiya Janata Party has suffered another major setback in Navi Mumbai. BJP corporator Tanuja Madhavi has joined NCP. It is learned that he took the watch in his presence in the presence of Sharad Pawar. In fact, municipal elections are coming up in a few days. Against that backdrop, this is considered a big blow for Ganesh Naik.

News English Title: Navi Mumbai BJP corporator Tanuja Madhavi has joined NCP news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x