8 May 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

आषाढी वारी | वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Pandharpur Ashadi Wari

मुंबई, १४ जून | महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आलाय.

राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करावं लागणार आहे. मात्र, वाखरीपासून दीड किलोमीटरचं अंतर पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Order of Maharashtra state government issued for Ashadi Wari news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x