14 December 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर

Sterling and Wilson Share Price

Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची गुंतवणूक असलेली स्टर्लिंग अँड विल्सन ही स्मॉल कॅप अक्षय ऊर्जा कंपनी एंड-टू-एंड सौर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या ऑपरेशन आणि देखभाल व्यवसायात देखील गुंतलेली आहे. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )

मंगळवारी या कंपनीचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह 745 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक 4.53 टक्के वाढीसह 737.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16950 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 747 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 253 रुपये होती. मागील 5 दिवसांत स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीच्या शेअरची किंमत 293 रुपये या आपल्या नीचांक पातळीवरून 145 टक्क्यांनी वाढली आहे. स्टर्लिंग अँड विल्सन ही रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा भाग असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेडने स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे 32.54 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर एफआयआयने या कंपनीचे 10.5 टक्के आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 10.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 1232 टक्के वाढीसह 1178 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 29.35 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीला 352 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sterling and Wilson Share Price today on 8 May 2024

हॅशटॅग्स

Sterling and Wilson Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x